Pimpri News : पार्किंग पॉलिसी रद्द करा; अन्यथा ‘भिक मांगो’ आंदोलन

ग्राहक हक्क संघर्ष समितीचा इशारा

एमपीसी न्यूज – शहरातील बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी 1 मार्चपासून महानगरपालिकेमार्फत पार्किंग पॉलिसी राबवण्यात येणार आहे. नागरिकांची आर्थिक परिस्थिती पाहता हि पॉलिसी रद्द करावी अशी मागणी ग्राहक हक्क संघर्ष समितीने केली आहे. पार्किंग पॉलिसी रद्द न केल्यास 15 फेब्रुवारीपासून पालिकेसमोर ‘भिक मांगो’ आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

ग्राहक हक्क संघर्ष समिती, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अमोल उबाळे यांनी याबाबतचे निवेदन महानगर पालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीनंतर शहरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच जाचक पार्किंग पॉलिसी लावून पालिका नागरिकांच्या खिशाला कात्री लावू पाहत आहे.

महानगरपालिकेकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उपलब्ध असताना पार्किंग पॉलिसी नागरिकांच्या माथी का मारली जात आहे, असा सवाल देखील या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. जनतेला न पवडणा-या या पॉलिसीचा पालिकेने सहानभुतीपुर्वक विचार करावा. जाचक पार्किंग पॉलिसी रद्द करवी. असे न केल्यास 15 फेब्रुवारीपासून पालिकेसमोर ‘भिक मांगो’ आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.