Pimpri News : ऑनलाईन मागवलेली ऑर्डर रद्द करणे पडले महागात

एमपीसी न्यूज- ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मागवलेली ऑर्डर रद्द करणे चांगलेच महागात पडले आहे,कारण   पैसे परत मिळविण्यासाठी अनोळखी व्यक्तीने (Pimpri News) अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर एटीएम कार्ड स्कॅन करण्यास सांगत बँकेची गोपनीय माहिती घेत खात्यातून 40 हजार 220 रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. हा प्रकार 10 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी आळंदी येथे घडला.
केदार सुधीर कांबळे (वय 40, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस (Pimpri News )ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांनी 10 ऑगस्ट रोजी फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून किचन सिंक मागवली. काही दिवसानंतर कांबळे यांना एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने कांबळे यांना सांगितले की, तुम्ही दिलेली ऑर्डर रद्द झाली आहे. (Pimpri News ) तुम्ही भरलेली रक्कम परत मिळविण्यासाठी एनी डेस्क रिमोट डेस्कटॉप हे अॅप डाउनलोड करा. त्यानंतर अल्पेमिक्स नावाचे अॅप डाउनलोड करा, असे सांगून कांबळे यांना त्यांचे एटीएम कार्ड स्कॅन करण्यास सांगितले. कांबळे यांनी त्यांचे एटीएम कार्ड स्कॅन केले असता आरोपीने बँकेची गोपनीय माहिती चोरली.
त्या माहितीच्या आधारे कांबळे यांच्या बँक खात्यातून प्रथम 20 हजार 220 रुपये आणि नंतर 20 हजार रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. (Pimpri News ) याबाबत कांबळे यांनी तक्रार केली असता त्यावर चौकशी करून 31 डिसेंबर रोजी याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.