Pimpri News: ‘सीसीसी’मधील गैरव्यहाराची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी – रमेश वाघेरे

एमपीसी न्यूज – स्पर्श हॉस्पिटलच्या भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स मधील कोविड केअर सेंटरला चुकीच्या पद्धतीने तीन कोटी रुपये अदा केले आहेत. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, एकही रुग्ण नसताना तसेच महापालिकेशी करार न करता स्पर्श हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरला बेकायदा तीन कोटी 14 लाख रुपये महापालिकेने दिले आहेत. याची चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

या प्रकाराची उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, माजी सनदी अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याकडून चौकशी करावी. स्पर्शची चौकशी महापालिकेतील स्थानिक अधिका-यांकडून करण्यात येवू नये.

जर स्थानिक अधिका-यांमार्फत चौकशी केल्यास आपल्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा वाघेरे यांनी निवेदनात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.