Pimpri news: विविध कार्यक्रमांनी अभियंता दिन उत्साहात साजरा

महापालिकेच्या अभियंत्यांना प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

0

एमपीसी न्यूज – भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या वाढदिवसा निमित्ताने साजरा करण्यात येणारा अभियंता दिन महापालिका ज्युनियर इंजिनिअर्स असोसिएशन मार्फत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कोव्हीड-19 मुळे या वर्षी अभियंता दिन मर्यादित स्वरूपात ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. महापौर माई ढोरे यांच्या हस्ते मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या अभियंत्यांना प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

पालिकेच्या विविध विभागांमार्फत विकसित केलेल्या व चालू असलेल्या प्रकल्पांचे मनपाच्या अभियंत्यांनी तयार केलेल्या चलचित्रीकरण गाण्याचे प्रकाशन महापौर ढोरे यांच्या हस्ते फेसबुक लाईव्ह व यूट्यूबवर प्रसिध्द करण्यात आले. मनपा अभियंत्यांनी सादर केलेल्या रेकॉर्डींग स्वरूपात गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, उपसंचालक राजेंद्र पवार, शहर अभियंता राजन पाटिल, सह शहर अभियंता मकरंद निकम, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशनचे जयकुमार गुजर, अध्यक्ष सुनिल बेळगांकर, कार्याध्यक्ष संतोष कुदळे आदी अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.