Pimpri News:  मोहरम साध्या पद्धतीने साजरा करा; आयुक्त राजेश पाटील

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहरम साध्या पद्धतीने साजरा करावा. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

मोहरम सण सोमवारी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. राज्य सरकारने 9 ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षी मोहरम साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा. नियमांचे पालन करावे. कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र, राज्य सरकारने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.