Pimpri news: सिंधी दिवस, चेटी चंद घरातच साजरे करा; विश्व सिंधी सेवा संगमचे आवाहन

0

एमपीसी न्यूज – कोरोनाची महामारी वाढत असल्यामुळे एप्रिल महिन्यात येणार्‍या सिंधी बांधवांच्या लाल शाही (वरजी), सिंधी दिवस, पकवान दिवस, आणि चेटी चंद आदी सण सामूहिक साजरे न करता आपल्या घरातच आनंदाने साजरे करावेत , असे आवाहन विश्व सिंधी सेवा संगम पिंपरी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

विश्व सिंधी सेवा संगम पिंपरी शाखेच्या पदाधिकार्‍यांची पिंपरी येथे मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला आंतरराष्ट्रीय निर्देशक धनराज मंघनानी, पिंपरी शाखेचे अध्यक्ष मनोहर जेठवानी, महिला विंगच्या अध्यक्षा किरण रामनानी, दिपक लोहाना, जयेश चौधरी, अजित कंजवानी, अशोक समतानी दिपक मदानी, प्रकाश पंमनानी, नारायण नाथानी, मनोज पंजाबी आदि उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

सिंधी बांधवाचे एप्रिल महिन्यात विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. संस्थेने ठरविलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

एप्रिल महिन्यात येणार्‍या लाल शाही (वरजी), सिंधी दिवस, पकवान दिवस, आणि चेटी चंद आदी सण सामुदायिक साजरे न करता आपल्या घरातच राहुन आनंदाने साजरे करावे, असे आवाहन विश्व सिंधी सेवा संगम पिंपरी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment