Pimpri News : ‘डिजिटल बोर्ड्समध्ये बदल करा’

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांची मागणी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी ( Pimpri chinchwad Smart City)  अंतर्गत विविध चौकात डिजिटल स्क्रीन बोर्ड्स (Digital screen Board)  बसवण्यात आले आहेत. विविध प्रकारची जनजागृतीसाठी करण्यासाठी या स्क्रिनचा वापर केला जात आहे. मात्र, या डिजिटल बोर्ड्समध्ये काही बदल करण्याची मागणी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने (Roatary Club Of Valhekarwadi) केली आहे.

याबाबत रोटरी क्लब वाल्हेकरवाडीचे गणेश बोरा माहिती देताना म्हणाले, डिजिटल बोर्ड्समुळे शहर विद्रुपीकरण आणि फ्लेक्सचा कचराही कमी होत आहे ही चांगली बाब आहे. मात्र, या डिजिटल बोर्ड्समध्ये काही बदल करणे गरजेचे आहे.

हे बदल करण्याची विनंती

 डिजिटल बोर्ड्सचा रात्रीच्या वेळेस ब्राईटनेस (Britness) कमी करण्याची सोय असावी. तसेच, डिजिटल बोर्ड रात्री 11 ते सकाळी 6 ह्या काळात बंद असावेत.

फ्लेक्स ऐवजी डिजिटल बोर्डचा वापर करण्यास नागरिक व व्यावसायिकांमध्ये जागृती करावे तसेच ह्याचे दर माफक ठेवून बुकिंग प्रक्रिया सुलभ करावी.

जहिरातीसाठी सार्वजनिक ठिकाणी होणारं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी विविध जागी लहान आकाराचे डिजिटल बोर्ड कमी खर्चात उपलब्ध करून द्यावेत.

उद्यान व रहदारिच्या ठिकाणी फिरते बोर्ड उपलब्ध करून दिल्यास फायदेशीर होईल.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.