Pimpri News : मेट्रोच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मेट्रोच्या कामासाठी हे बदल करण्यात आले आहेत. कीज हॉटेल पिंपरी ते हॅरिस ब्रिज दापोडी या दरम्यानची जुन्या महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सर्व्हिस रोडवर वळविण्यात येणार आहे.

संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज मेट्रो स्टेशनच्या वॉटर टँक, फुट ओव्हर ब्रिजचे फुटिंग, स्टेअर केस व लिफ्टचे काम करण्यात येणार आहे. संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज दरम्यान मेट्रोचे कामकाज पूर्ण होईपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

किज हॉटेल, पिंपरी ते हॅरिस ब्रिज, दापोडी दरम्यान मेट्रोचे सकाळी 11 ते दुपारी 5 आणि रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत काम करण्यात येणार आहेत. या कामामुळे जुना पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सर्व्हिस रोडने वळविण्यात येणार आहे. या वेळेत वाहतूक संथ गतीने चालणार आहे.

या वाहतुक बदलाबाबत मेट्रोचे कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.