Pimpri news : पिंपरी उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम टप्प्याटप्प्यात करण्यात येणार आहे. यामध्ये गोकुळ हॉटेल ते पिंपरी पूल या दरम्यानचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

या बदलाचे आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने पिंपरी चौकातून अहिल्यादेवी चौकमार्गे पिंपरी पुलाकडे जातील.

उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील कामादरम्यान अहिल्यादेवी चौक ते पिंपरी पूल या दरम्यानची वाहतूक दुहेरी मार्गाने राहील. तसेच पुलाखाली राहणारे स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिक क्रोमा शोरूम मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.