Pimpri News : गृह निर्माण सोसायटीतील नागरिकांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधक उपाययोजनांचा भाग म्हणून आज गृहनिर्माण सोसायटींमधील नागरिकांसाठी मार्गदर्शनपर सभा आयोजित केली होती. पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने हि सभा पार पडली. पाटील यांनी यावेळी नागरिकांना सूचना केल्या.

पाटील म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने वेळोवेळी आदेश व मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात आहेत. गृह निर्माण सोसायटी मधील नागरिकांनी काटेकोरपणे या सूचनांचे पालन करावे. व महापालिकेला सहकार्य करावे असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

या ऑनलाईन सभेसाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, गृह निर्माण फेडरेशन अध्यक्षा तेजस्विनी ढोमसे, सेक्रेटरी प्राजक्ता रुद्रवार, आरोग्य मित्र फाऊंडेशन अध्यक्ष राजीव भावसार, पीसीसीएफचे तुषार शिंदे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड मधील 60 वर्षावरील नागरिक तसेच 45 ते 50 या वयोगटातील सहव्याधी (अतिजोखमीच्या) असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. महानगरपालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण करण्यात येत असून शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.