Pimpri News : विना मास्क फिरणा-यावर पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिक नाखुश ?

एमपीसी न्यूज – विना मास्क बाहेर फिरणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचं काम पालिका व पोलीस संयुक्तपणे करत आहेत. मात्र, विना मास्क फिरणा-या नागरिकांवर पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिक नाखुश असल्याचे चित्र आहे.

तसेच, पोलिसांनी आता गुन्हेगारांचा बंदोबस्त करायचा का विना मास्क फिरणा-या नागरिकांवर कारवाई करत फिरायचं असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. शिवाय आकारण्यात येणारा दंड देखील अधिक असल्याची तक्रार सामान्य नागरिक करत आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने विना मास्क बाहेर फिरणा-यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी थूंकणा-यांवर महानगरपालिकेने बंदी घातली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

कारवाई करुन दंड वसूल करण्याचे काम पोलीस व महानगरपालिकेचा आरोग्य विभाग करत आहेत. मात्र, विना मास्क फिरणा-यावर कारवाईचे काम पोलीस प्रशासनाकडे देखील सोपवले असल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोरोना काळात बंदोबस्ताची कामे असो की, कंटेन्मेंट परिसरात ड्युटी करणं पोलिसांना अतिरिक्त जबाबदारी देऊन त्यांना ठिक ठिकाणी बंदोबस्ताची कामे लावली जात होती. अशात कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर काही पोलीस कर्मचारी दगावले देखील. अशात शहरात गुन्हेगारेचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करायचा का विना मास्क फिरणा-या नागरिकांवर कारवाई करत फिरायचं असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांकडून कारवाई केली जात असली तरी कारवाईची दिली जाणारी पावती हि पालिकेची असल्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे काही पोलीस कर्मचारी म्हणत आहेत. शिवाय विना मास्क फिरणा-या नागरिकांवर कारवाई पोटी वसूल केली जाणारी रक्कम जी 500 रुपये एवढी असून ती अधिक असल्याची तक्रार सामान्य नागरिक करत आहेत. होणा-या कारवाई वर ऐणवेळी 500 रुपये कुठून भरायचे असाही प्रश्न नागरिक करत आहेत.

दरम्यान, याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना विचारले असता विना मास्क फिरणा-यावर कारवाईचे अधिकार पालिकेचा आरोग्य विभाग व पोलीस यांच्याकडे सोपवली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दोघांनाही कारवाईचे समान अधिकार असल्याचे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.