Pimpri News: कोरोना चाचणीसाठी नागरिकांचे वायसीएमसमोर कडक उन्हात वेटिंग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या रुग्णांना उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे. रुग्णांचे प्रमाण वाढल्याने कोरोना तपासणी करण्यासाठी येणा-या संशयित रुग्णांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात सुविधा वाढविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित कुदळे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून 600 ते 800 नवीन रुग्णांची दिवसाला भर पडत आहे. बाधिताच्या संपर्कातील नागरिकांचीही तपसाणी केली जाते.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे कोरोना तपासणी करणा-यांचे प्रमाण वाढले आहे. वायसीएम रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली जाते. संशियितांची वाढती संख्या असल्याने चाचणीसाठी लवकर नंबर येत नाही.

सध्या बाहेर कडक उन आहे. नागरिकांना उन्हात थांबावे लागते. त्यासाठी सावलीसाठी मंडप टाकण्यात यावा, अशी मागणी होत आहे. तसेच चाचणीसाठी रांगा लावताना सुरक्षित अंतराचे पालन केले जात नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच रुग्ण वाढल्याने वायसीएमवरील ताण वाढला आहे. त्यांना सुविधा वाढवून देण्याची आवश्यकता असल्याचेही कुदळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.