Pimpri News: निगडी प्राधिकरण, चिंचवड व दापोडी येथील नागरी सुविधा केंद्रे होणार बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात खासगी तत्वावर कार्यान्वित करण्यात आलेल्या 22 नागरी सुविधा केंद्रांसाठी महापालिकेकडून मुदतवाढ देण्यात येणार आहे. तर, निगडी – प्राधिकरण, दापोडी आणि चिंचवड येथील 3 केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. या तीन केंद्र चालकांच्या नागरी सुविधा केंद्राच्या नेमणुका रद्द केल्या आहेत.

महापालिकेच्या तसेच इतर शासकीय, निमशासकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी तिस-या टप्प्यात एकूण 25  ठिकाणी खासगी तत्वावर नागरी केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. 25 जुलै 2018 रोजी हे केंद्र सुरु करण्याबाबतचा ठराव मंजूर झाला होता. 28 ऑगस्ट 2018 रोजी एकूण 25 नागरी सुविधा केंद्र चालकांना 3 वर्ष कालावधीसाठी करारनामा करुन नियुक्ती आदेश बजावला होता. त्याची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली.

यातील 3 केंद्र चालकांच्या नागरी सुविधा केंद्रासाठी नेमणुका रद्द केल्या आहेत. तर, 22 केंद्रांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली जाणार आहे. दिघी, भोसरी, निगडी, चिंचवड, आकुर्डी , रावेत, वाल्हेकरवाडी, पिंपरीगाव, वाकड, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव आदी परिसरातील हे केंद्र आहेत.

दरम्यान, या 3 केंद्र चालकांच्या नागरी सुविधा केंद्रासाठीच्या नेमणुका 15 दिवसांपापूर्वी रद्द केल्या आहेत. नव्याने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.