Pimpri news: स्वच्छ सर्वेक्षण! पालिकेतर्फे मराठी लघुफिल्म व गीत स्पर्धा

एमपीसी न्यूज – स्वच्छ महाराष्ट्र/ भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरु झालेले आहे. या अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे तसेच माहिती, शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतु आहे. त्या अनुषंगाने मराठी लघुफिल्म (Short Movie) व गीत (Jingle) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. सदर फिल्म किंवा गीता मध्ये पिंपरी-चिंचवड शहराचे नाव येणे अनिवार्य आहे. कच-याबाबत नागरिकांची जबाबदारी, ओला सुका कचरा वर्गीकरण, हगणदारी मुक्त शहर, कचरामुक्त शहर, प्लास्टीकबंदी, कोवीड 19 स्वच्छता विषयक बाबींबाबत मराठी लघुफिल्म (Short Movie) व गीत (Jingle) मोबाईल मध्ये रेकॉर्ड करुन महापालिकेच्या [email protected] या ईमेल आयडी 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत पाठविण्याचे आवाहन केले आहे.

प्राप्त होणा-या स्पर्धकामधुन पालिकेतर्फे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येईल. शहरातील जास्तीत जास्त नागरीक / संस्था यांनी सहभाग नोंदवुन पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यास महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.