Pimpri News: लिपिक, भांडारपाल यांना मूळ विभाग सोडवेना, बदली रद्दचे प्रस्ताव फेटाळले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ( Pimpri chinchwad Municipal Corporation)  मुख्य लिपिक, लिपिक, सहाय्यक भांडारपाल, ग्रंथपाल कम लिपिक बदल्यांच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. तर त्यांनी बदली रद्द करण्याचा पाठविलेला प्रस्ताव प्रशासनाने रद्द केला आहे. संबंधितांना बदली आदेश बजाविला नसल्यास विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस (Show cause notice)  देवून खुलासा मागविण्यात यावा आणि कारवाई करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त अजित पवार (Additional Commissioner Ajit Pawar ) यांनी दिले आहेत.

महापालिकेतील मुख्य लिपिक, लिपिक, सहाय्यक भांडारपाल, ग्रंथपाल कम लिपिक पदावरील कर्मचा-यांची बदली करण्यात आली आहे. तथापि, काही कर्मचारी बदलीच्या विभागात रुजू झालेले नाहीत. काही कर्मचा-यांनी बदली रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले होते.

बदल्यांच्या अनुषंगाने, बदली रद्द करण्याबाबत प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, बदली झालेले व अद्यापही बदली विभागामध्ये रुजू न झालेल्या कर्मचा-यांबाबत प्रशासनाने माहिती मागविली आहे.

संबंधित कर्मचा-यांना बदली आदेश बजाविण्यात आला आहे काय, बजावला असल्यास त्याची पोहोच सादर करावी. बदली आदेश बजाविण्यात आला नसल्यास संबंधितांकडून आदेश का बजाविण्यात आलेला नाही. याबाबत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देवून खुलासा घ्यावा. कारवाई करावी. त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश आदेश देण्यात अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

बदली झालेल्या सर्व कर्मचा-यांचे जानेवारी 2021 चे वेतन बदली करण्यात आलेल्या विभागातून करण्याबाबत स्पष्ट केले आहे. त्यानुसार सर्व संबंधित कर्मचा-यांचे जानेवारी महिन्याचे वेतन बदली झालेल्या विभागातून होईल याची सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.