Pimpri News :   गिर्यारोहक सागर नलवडे “ब्रॅन्ड कोल्हापूर” पुरस्काराने सन्मानित 

एमपीसीन्यूज  :  कोल्हापूर जिल्ह्यातील करनूर गावचे सुपूत्र गिर्यारोहक सागर विजय नलवडे यांनी  सह्याद्रीसाठी दिलेले योगदान व गिर्यारोहण क्षेत्रात केलेली उत्तम कामगिरी याची दखल घेत त्यांना ब्रॅन्ड कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  सतेज पाटील  याच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या व्यक्तींना ब्रॅन्ड कोल्हापूर पुरस्कार दिला जातो.

गिर्यारोहक विजय सागर नलवडे यानी आजवर सह्याद्रीसाठी दिलेले योगदान व गिर्यारोहण क्षेत्रात लिंगाणा सोलो आरोहण तसेच युरोप खंडातील रशिया येथील सर्वात उंच हिमशिखर माऊन्ट एलब्रुस व आफ्रिका खंडातील टाझांनिया येथील सर्वांत उंच हिमशिखर माऊन्ट किलीमाजंरो सर करुत जागतिक विक्रम करुन कोल्हापुरचे नाव जागतिक पातळीवर मोठे केले आहे.

याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  सतेज  पाटील, प्रधान सचिव भूषण  गगराणी, आमदार ऋतुराज पाटील  यांच्या  हस्ते एका कार्यक्रमात ब्रॅन्ड कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जगातील सात खंडातील सात सर्वोच्च हिमशिखरे सर करण्याचे  गिर्यारोहक सागर विजय नलवडे यांचे ध्येय आहे. त्यांनी आतापर्यंत दोन खंडातील दोन हिमशिखरे सर केली आहेत. त्याचे पुढिल ध्येय जगातील सर्वात उंच शिखर माऊन्ट एव्हरेस्ट सर करण्याचे आहे. या कार्यामप्रसगी त्याच्या माऊन्ट एव्हरेस्ट मोहिमेसाठी भारतीय ध्वज देऊन लागेल ती मदत करण्याचे आश्वासन  सतेज पाटील यांनी दिले.

या प्रसंगी कोल्हापूर  डिस्ट्रिक माऊटेनिअरिगं असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अमर अडके उपस्थित होते.

गिर्यारोहण क्षेत्रात कार्य करत असताना आजवर बरेच सन्मान, पुरस्कार मिळाले आहेत. पण आपल्या जन्मभुमी कोल्हापूर येथे आपल्या लोकांसमोर आपल्या लोकांनी दिलेली हि सन्मानस्वरुपी पाठिवरील कौतुकाची थाप पुढिल कार्य करण्यास आणखी बळ देईल, अशी भावना गिर्यारोहक सागर नलवडे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.