Pimpri News : शहरात हाॅटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये ग्राहकांचा थंड प्रतिसाद, अजूनही पार्सल सेवेलाच प्राधान्य

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड मध्ये आजपासून सुरू झालेल्या हाॅटेल्स व रेस्टॉरंट्स याठिकाणी थंड प्रतिसाद पहायला मिळाला. राज्याने 50 टक्के क्षमतेने आजपासून (दि.5) हाॅटेल्स, रेस्टॉरंट्स व बार सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र अजून ग्राहकांचा यासाठी हवा तसा प्रतिसाद मिळत नसून पार्सल सेवेलाच प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन लागू केल्यानंतर ‌अनलाॅक प्रक्रियेअंतर्गत विविध आस्थापना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रात हाॅटेल्स, रेस्टॉरंट्स व बार सुरू करण्याची परवानगी दिली नव्हती.

हाॅटेल्स, रेस्टॉरंट्स व बार व्यवसायिकांच्या विनंती नंतर राज्य सरकारने आजपासून (दि.5) 50 टक्के क्षमतेने हाॅटेल्स, रेस्टॉरंट्स व बार सुरू करण्याची परवानगी दिली आहे. असे असले तरी भिती पोटी ग्राहक अजूनही याठिकाणी टाळाटाळ करताना दिसत आहेत.

मागील काही दिवसांपासून पार्सल सेवा सुरू असल्यामुळे बहुतांश लोक पार्सल सेवेलाच प्राधान्य देत आहेत. जसजशी परिस्थिती निवळेल तसे लोक हाॅटेल्स, रेस्टॉरंट्स आत मध्ये बसतील असे मत व्यवसायिकांनी व्यक्त केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.