Pimpri News: झोपडपट्ट्यांची रंगरंगोटी, सुशोभीकरण सुरु; शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे यांच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अण्णासाहेब मगर नगर झोपडपट्ट्यांच्या दर्शनी भागावर रंगरंगोटीचे काम सुरु झाले आहे. शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे यांनी रंगरंगोटी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात मुख्य रस्त्याच्या कडेला अनेक झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्ट्या वेडी-वाकड्या पद्धतीने वसल्यामुळे मुख्य रस्ते हे विद्रुप दिसतात. पिंपरी-चिंचवड मधील नामवंत चित्रकार सुनील शेगावकर यांच्या मार्फत झोपडपट्टीच्या दर्शनी भागावर काही सुशोभीकरणाच्या दृष्टीने बदल करण्यास व त्याप्रमाणे रंगरंगोटी करण्याची मागणी शहर सुधारणा समितीच्या सभापती अनुराधा गोरखे यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती.

त्यानुसार शहरातील झोपडपट्ट्यांपैकी एक असणारे आण्णासाहेब मगर नगर झोपडपट्टीच्या दर्शनी भागावर प्रायोगिक तत्वावर सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टीच्या दर्शनी भागावर रंगरंगोटी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.