Pimpri News: दिलासादायक! डेल्टा प्लसचा शहरात एकही रुग्ण नाही

महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज

एमपीसी न्यूज – कोरोनाचा दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच कोविडच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटने राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली. हा नवीन डेल्टा प्लस व्हायरस झपाट्याने पसरत आहे. नवीन डेल्टा प्लसची बऱ्याच केसेस महाराष्ट्रात आहे. डेल्टा प्लसचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज झाला असून, त्यासाठी स्वतंत्र तपासणी व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे. शहरात अद्यापर्यंत डेल्टा प्लस व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरातील कोरोनाची दुसरी लाट तीव्र होती. आता दुसरी लाट ओसरू लागली होती. पॉझिटिव्हीटी रेट पाचच्या आत आलेला आहे. मात्र, दुसरी लाट ओसरतेय की नाही तोपर्यंतच डेल्टा प्लसचे नवे संकट उभे राहिले आहे. या आजाराचे राज्यात रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले असून सोमवारपासून निर्बंध लादले आहेत. दिवसभर जमावबंदी तर सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू केली आहे. महापालिकेच्या वतीने तयारी सुरु केली असून पिंपरी, आकुर्डी, थेरगाव आणि भोसरी रुग्णालये सुरू केली आहेत. औषधोपचाराराचे नियोजन, डॉक्टर, परिचारिका स्टाफ भरती केली जात आहे.

तसेच नवीन व्हेरीट आल्याने त्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना आयुक्तांनी वैद्यकीय विभागास दिलेल्या आहेत. रुग्णांची तपासणी आणि उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्याचे नियोजन आहे. तसेच नागरिकांनी नियमित नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी सरकारी सूचनांचे पालन केल्यास यावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

याबाबत वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”डेल्टा हा कोरोनाचाच व्हायरस आहे. वेगवेगळ्या भागात कोरोनाचा नवीन व्हेरीयट आढळला आहे. मात्र, महापालिका क्षेत्रात नवीन व्हेरीयटचा एकही रुग्ण आढळलेला नाही. डेल्टा नॉर्मल आहे की जास्त प्रसार करणारा आहे हे आत्ताच सांगता येणार नाही. पण, महापालिकेची पूर्ण तयारी आहे. तिस-या लाटेच्या दृष्टीने नियोजन केले आहे. सर्व हॉस्पिटल चालू आहेत. थेरगाव, आकुर्डी, जिजामाता आणि नवीन भोसरी हे चार हॉस्पिटल तयार आहेत. ऑटो क्लस्टर, जम्बो सेंटर उपलब्ध आहे. लसीकरणावर भर दिला आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. म करण्याचे नियोजन आहे. गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेलमध्ये सीसीसी सेंटर करण्याचे आवाहन केले आहे”.

कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारची लक्षणे!
# कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, कोरडा खोकला, थकवा
# कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या तीव्र लक्षणांमध्ये छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, अशा लक्षणांचा समावेश
# त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल यासारखे लक्षणेही दिसून येतात
# सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी आणि अतिसार यांचा समावेश असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट कसा टाळता येईल?
# घराबाहेर पडताना दुहेरी मास्क घाला
# आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा
# 20 सेकंद तरी साबणाने आपले हात स्वच्छ धुवा
# सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, लोकांपासून 6 फूट अंतर ठेवा
# घरातल्या आणि आसपासच्या वस्तू स्वच्छ ठेवा आणि निर्जंतुकीकरण ठेवा
# बाहेरून सामान आणल्यास निर्जंतुकीकरण करा आणि त्वरित स्पर्श करू नका.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.