Pimpri News: राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवा : संजोग वाघेरे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 22 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

0

एमपीसी न्यूज – कोरोना संकटात राज्य सरकारसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारे जनतेला मदत करण्याची भूमकिा घेण्यात आली. यात नेते, पदाधिकारी आणि सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. येणा-या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे आणि लोकनेते शरद पवार यांचे विचार अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे लागणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आज, गुरुवारी व्यक्त केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने पिंपरी खराळवाडी येथील मुख्य कार्यालयात शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

या प्रसंगी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सेवादल अध्यक्ष महेश झपके, विधानसभा अध्यक्ष संदीप चिंचवडे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, प्रदेश ओबीसी प्रभारी सचिव सचिन औटे, पदवीधर शहराध्यक्ष माधव पाटील, युवक संदीप चिंचवडे, महिला संघटिका कविता खराडे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष यतीन पारेख, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष पल्लवी पांढरे, भोसरी  अध्यक्ष मनीषा गटकळ, चिंचवड  अध्यक्ष संगीता कोकणे, सरचिटणीस अमोल भोईटे, उपाध्यक्ष अकबर मुल्ला, संतोष वाघेरे,शशिकांत निकाळजे, अभिजित आल्हाट, रशीद सय्यद, निखिल दळवी, बाळासाहेब पिल्लेवार, ज्योती निंबाळकर, सुनील अडागळे, पोपाट पडवळ आदी उपस्थित होते.

संजोग वाघेरे पुढे म्हणाले, आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आहे. निवडणुकीची तयारी म्हणून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सत्ताधारी भाजपनं मागच्या चार वर्षात केलेल्या कामात अनेक ठिकाणी गोंधळ आहे.‌ अनागोंदी कारभार सुरू आहे. नुसत्या घोषणा केल्या. त्याचा लोकांना कुठेही फायदा झालेला नाही. अनेक प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत. काही कामांचे नियोजन चुकलेले आहे. या पद्धतीची कामे पाहून त्यावर ठोस भूमिका घेणे, असे प्रकार नागरिकांच्या लक्षात आणून देण्यासाठी‌ आपल्याला पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करावे लागणार आहे.

माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मंगला कदम यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तर, सामाजिक न्याय विभागाच्या महिला शहराध्यक्ष गंगा धेंडे यांच्या वतीने गरजूंना एका महिन्याच्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment