Pimpri News : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या एक वर्षाच्या कारकिर्दीनिमित्त त्यांच्या कार्याचे अभिनंदन व सत्कार

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुस्काराने सन्मानित व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे यांनी विविध संघटनांच्या वतीने आज पोलीस आयुक्तालयात आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या एक वर्षाच्या कारकिर्दीनिमित्त त्यांच्या कार्याचे अभिनंदन व सत्कार केला.

यावेळी आयुक्तांना पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच कायदा आणि सुव्यवस्थेविषयी निवेदनही करण्यात आले.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे शहर अध्यक्ष राजू आवळे, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर कांबळे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उद्योग कक्षाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी बिग्रेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्ष स्मिता म्हसकर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुभाष देसाई, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष प्रकाश बाबर, संघटक गोविंद खामकर, महासचिव सचिन दाभाडे व ज्येष्ठ नेते अशोक सातपुते आदी उपस्थित होते.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, कायदा व सुव्यवस्था पोलिसांच्या संख्येवर अवलंबून नसून त्यांच्या समाजावर असलेला दराऱ्यावर अवलंबून असते हे आपल्या कृतीतून कृष्ण प्रकाश यांनी सिद्ध केले आहे. पुण्याच्या लोकसंख्ये इतकीच लोकसंख्या व पुण्याच्या क्षेत्रफळाच्या जास्त क्षेत्रफळ असे असताना तसेच पोलीस बळ पुण्याच्या निम्म्यापेक्षा कमी असून ही कायदा व सुव्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत, अजून ही बरेच काम करावयाचे शिल्लक आहे. ते पूर्ण करण्यासाठी विविध संघटनाच्या व नागरिकांच्या वतीने अपेक्षा केली जात आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.