Pimpri news: केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे शुक्रवारी पिंपरीत आंदोलन

एमपीसी न्यूज – देशाचा पोशींदा बळीराजाला उध्वस्त करणारा कायदा केंद्र सरकारने ताबडतोब मागे घ्यावा. तसेच हुकूमशाहीकडे वाटचाल करणा-या व भांडवलदारांना अनुकूल कायदे करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि. 2) आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिली आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेतील पिढीत तरुणीस श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.