Pimpri News : इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

एमपीसी न्यूज – दररोज होणा-या इंधन दरवाढीविरोधात पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने आज (शनिवारी) सायकल रॅली काढण्यात आली. महागाई आणि इंधनदरवाढीचा निषेध केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून महागाई व इंधन दरवाढी विरोधात शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देत निषेधात्मक सायकल रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, सतिश भोसले, ज्येष्ठ नेते किसन भालेकर, तानाजी काटे तसेच मयूर जयस्वाल, चंद्रशेखर जाधव, शोभा पगारे, बाबा बनसोडे, सज्जी वर्की, शहाबुद्दीन शेख, सुनिल राऊत, विशाल कसबे, कुंदन कसबे, अक्षय शहरकर, गुंगा क्षीरसागर, संदेश बोर्डे, गौरव चौधरी, मकर यादव, लक्ष्मण रुपनर, विश्वनाथ खंडाळे, अनिरुध्द कांबळे आदींनी सहभाग घेतला. रॅलीचा समारोप वल्लभनगर येथिल यशवंतराव चव्हाण पुतळ्यासमोर झाला.

साठे म्हणाले, ”रोज वाढणारे इंधनदर त्यामुळे वाहतूक खर्च वाढत आहेत. वाढणा-या वाहतूक खर्चामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. ह्या महागाईमुळे देशभरातील नागरीकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात तीव्र असंतोष आहे. नागरीकांच्या या विरोधाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून केंद्रिय मंत्रीमंडळात मोदींनी फेरबदल करुन माध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रीमंडळात फेरबदल करुन उपयोग नाही, तर केंद्र सरकारच बदलणे गरजेचे आहे. अशी आता सर्वसामान्य जनतेची मागणी आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.