Pimpri News : ठेकेदारांनी कामे मिळवण्याच्या स्पर्धेत न अडकता नियोजनबद्ध प्रगतीसाठी प्रयत्न करावेत

अर्थतज्ज्ञ विनीत व्यंकटेश देव यांचे प्रतिपादन

एमपीसी न्यूज – कोविडच्या परिस्थितीमुळे शासनाचे अर्थकारण अडचणीत आले आहे. ठेकेदारांची मदार बऱ्यापैकी शासनावर असते. त्यामुळे ठेकेदारांनी कामे मिळविण्याच्या स्पर्धेत अडकून बोजा वाढविण्यापेक्षा नियोजनबद्ध प्रगती साधण्यासाठी ठेकेदारांनी प्रयत्न करायला हवेत. असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ  व पॉझिव्ह्यू कन्सल्टींगचे चेअरमन विनित व्यंकटेश देव यांनी केले.

पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विनित देव यांनी ‘कोविड आणि ठेकेदारांचे आर्थिक नियोजन’ या विषयावर सर्व ठेकेदारांना मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ ठेकेदार अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर्सचे सुनिल अजवानी, पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बिपिन नाणेकर, ज्येष्ठ ठेकेदार प्रशांत उर्फ बंडू खुळे यांसह पिंपरी-चिंचवड शहरातील अन्य ठेकेदार उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

ताळेबंद, नियोजन आणि पुढील अंदाजपत्रक यांचा सखोल अभ्यास करून ठेकेदारांनी वाटचाल करण्याची गरज असल्याचे विनीत देव म्हणाले. यावेळी ठेकेदारांनी महापालिका आणि शासनाबरोबर काम करताना उद्भवणा-या अडचणींचा पाढा वाचला व असोसिएशनने यावर तोडगा काढण्यासाठी काम करावे अशी मागणी केली.

सर्वसाधारण सभा यशस्वी होण्यासाठी पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी अशोक शिरोळे, संभाजी दौंडकर, सचिन जाधव, महेश शिंदे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विजय बोत्रे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like