Pimpri News: कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 36 दिवसांवर

शहरातील रुग्णवाढ स्थिर होत आहे. सप्टेंबरमध्ये रुग्णवाढ कमी होईल. सध्या दिवसाला चार ते सव्वाचार हजार चाचण्या केल्या जात आहेत. बेडची अडचण नाही. ऑक्सिजन बेड रिकामे आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी जुलैअखेर 9 दिवसांवर होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 14, दुस-या आठवड्यात 22 दिवसांवर होता. त्यानंतर आत्ता रुग्णदुप्पटीचा कालावधी 36 दिवसांवर पोहोचला असल्याची माहिती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. सप्टेंबरमध्ये रुग्णवाढ कमी होईल. सध्या दिवसाला चार ते सव्वाचार हजार चाचण्या केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत जुलै, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झपाट्याने वाढ झाली. शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 43 हजार 374 वर पोहोचली आहे. शहरात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

आजपर्यंत 29 हजार 722 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. तर, शहरातील 825 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 36 दिवसांवर गेला आहे. जुलैअखेरपर्यंत शहरातील रुग्णवाढीचा कालावधी 9 दिवसांवर आला होता.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 14 दिवसांपर्यंत होता. दुस-या आठवड्यात 22 दिवसांवर आला होता. आता 36 दिवसांवर पोहोचला आहे. म्हणजे आजपासून पुढे दुप्पट रुग्ण होतील.

शहरातील रुग्णवाढ स्थिर होत आहे. सप्टेंबरमध्ये रुग्णवाढ कमी होईल. सध्या दिवसाला चार ते सव्वाचार हजार चाचण्या केल्या जात आहेत. बेडची अडचण नाही. ऑक्सिजन बेड रिकामे आहेत.

व्हेंटिलेटरची देखील कमतरता नाही. आता काही रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यांना बिल द्यावे लागत आहे. जम्बो रुग्णालयाच्या सुविधा सुरु झाल्यानंतर नागरिकांना खासगी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.