Pimpri News: शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 90 हजाराच्या उंबरठ्यावर; आज 158 नवीन रुग्णांची नोंद

95 जणांना डिस्चार्ज, चार मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या नव्वद हजाराच्या उंबरठ्यावर गेली आहे. शहराच्या विविध भागातील 158 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 89 हजार 946 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 95 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील चार जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये यमुनानगर येथील 85 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 70 वर्षीय पुरुष, भोसरीतील 78 वर्षीय पुरुष आणि च-होलीतील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 89 हजार 946 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 86 हजार 773 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1573 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 651 अशा 2224 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 631 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1188 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.