Pimpri corona Update: शहरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले, आज 1131 नवीन रुग्ण

371 जणांना डिस्चार्ज, 21 मृत्यू,

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज (गुरुवारी) पुन्हा वाढ झाली आहे. शहराच्या विविध भागातील 1105 आणि पालिका हद्दीबाहेरील 26 अशा 1131 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 38 हजार 821 झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 371 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज शहरातील 17 आणि पालिका हद्दीबाहेरील 4 अशा 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामध्ये निगडी (पुरुष 52 वर्ष ) आकुर्डी ( 54 व 55 वर्षीय पुरुष ) चिंचवड ( 33 व 62 वर्षीय पुरुष ) मोशी (पुरुष 62 वर्ष) वल्लभनगर (पुरुष 66 वर्ष) जुनी सांगवी ( 54 व 73 वर्षीय स्त्री ) चिखली ( 63 , 45 व 66 वर्षीय पुरुष ) थेरगांव (स्त्री 60 वर्ष) मासुळकर कॉलनी (पुरुष 78 वर्ष) कासारवाडी ( 54व 55 वर्षीय पुरुष ) अजमेरा (स्त्री 73 वर्ष) कल्याण(स्त्री 61 वर्ष) खेड (पुरुष 54 वर्ष) जुन्नर (स्त्री 60 वर्ष) सोमाटणे (स्त्री 72 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

शहरात आजपर्यंत 38 हजार 821 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 25 हजार 770 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 736 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 145 अशा 881 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6631 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.