Pimpri News: कोरोनामुळे जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांना मोठे आव्हान : डॉ.किशोर खिल्लारे

एमपीसी न्यूज – 1919 साली पाहिले महायुद्ध समाप्त झाले. परंतु स्पॅनिश फ्लू नावाची भयंकर महामारी युरोपच्या इतिहासात पसरली. त्या काळात मास्क आणि लॉकडाऊन सक्तीचे करण्यात आले होते. मेडिकल सायन्स त्याकाळात इतके विकसित नव्हते. त्यामुळे लाखो लोक स्पॅनिश फ्लूने मेले. कोरोना विषाणूचा प्रसार आणि त्याबद्दल जागतिक स्तरावर खूप मोठे आव्हान शास्त्रज्ञांना कोरोनामुळे समोर उभे ठाकले. शंभर वर्षांनी चीनमधून कोरोना विषाणू जगभर पसरला. कोरोना सारखी महामारी शतकांनंतर जगाने प्रथमच अनुभवली आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.किशोर खिल्लारे यांनी केले.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र समितीने ‘कोविड लाटा, आव्हाने आणि दिशा’ या विषयावर आयोजित ऑनलाइन अभ्यास शिबिरात डॉ. खिल्लारे बोलत होते. त्यांनी संपूर्ण देशातील पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा काय परिणाम झाला याचे विश्लेषण केले. ते म्हणाले पुढे म्हणाले कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रतिबंधात्मक काळजी घ्यायला हवी. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेने गंभीर अनुभव दिलेला आहे. कोरोना संसर्गजन्य आहे, या विषाणूंच्या तीन कड्या आहेत, पहिल्या कडीत तो एका व्यक्तीमध्ये संक्रमित असतो, दुसर्‍या कडीत कुटुंब आणि मानवी समूहाकडे पहिल्या रुग्णामध्ये पसरतो आणि तिसर्‍या कडीमध्ये आजूबाजूच्या पर्यावर्णमध्ये विषाणू सर्वत्र असतो. त्यामुळे सरकारचे आरोग्य खाते साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदीचे निर्बंध जारी करते.

सर्दीसारख्या आजारामुळे हा विषाणू पसरतो, कोरडा खोकला येतो, जीभ बेचव होते, हा विषाणू अतिशय लबाड असतो, आसपास कुठे तरी याची लागण होते. किरकोळ सर्दी पडसे, ताप आल्यावर दोनचार गोळ्या घेतल्यावर बरे वाटते त्यामुळे मला कोरोना झालेला नाही, अशा अज्ञानात लोक असतात. मात्र अशाच वेळेला कोरोना विषाणू चार पाच दिवसांनी नाकातोंडा वाटे फुफुसात पसरतो, मग थोडासा दम लागतो, थकवा येतो इथे आपण लक्षात घेतले पाहिजे की ही वेळ गांभीर्याने तपासणी करण्याची आहे. सर्वत्र संचार बंदी, भय, भीती असते, औषधें, इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, मनुष्यबळ याची सप्लाय चैन कोसळते.

ज्या देशांनी युद्धे अनुभवली आहेत. त्या युरोप, व्हिएतनाम, चीन,जपान इ देशातील जनतेला स्वतःच्या जीवासाठी नियम पाळण्याची परंपरागत शिस्त आहे. त्यामुळे त्या देशांनी कोरोनाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटाचा यशस्वी मुकाबला केला आहे. आपणही हे आव्हान स्वीकारून कोरोनाविरोधात लढाई यशस्वी करू, सामाजिक कार्यकर्त्यानी या लढाईत कोरोनविरोधात मोठे योगदान द्यावे, असे किशोर खिल्लारे यांनी आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.