Pimpri News: उद्यापासून झोपडपट्टीवासीयांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण – आयुक्त पाटील

कंपन्यांच्या सहाय्याने कारखाने, शाळांमध्येही करणार लसीकरण

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. सध्या शहरात 89 लसीकरण केंद्रे असून 150 केंद्रे तयार करण्याचे नियोजन आहे. उद्यापासून झोपडपट्ट्यांमधील 45 वर्षापुढील नागरिकांना लस देण्याची मोहिम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी 20 शालेय बस तैनात केल्या आहेत.

यासाठी स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. तसेच टाटा मोटर्सच्या सहाय्याने कारखान्यातील कामगारांसाठी लसीकरण सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 71 झोडपट्या आहेत. त्यामध्ये सुमारे तीन लाख लोकसंख्या आहे. महापालिका उद्यापासून झोपडपट्ट्यांतील 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

20 शालेय बसच्या माध्यमातून झोपडपट्टीतील नागरिकांना लसीकरण केंद्रावर घेवून जाण्यात येणार आहे. झोपडपट्टीच्या जवळील केंद्रावर नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

बसचे डिझेल आणि वाहनचालकाचा जेवण खर्च महापालिका करणार आहे. महापालिकेकडे कोरोना लसीचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत, असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

आयुक्त पाटील म्हणाले, टाटा मोटर्स कंपनीत आजपासून लसीकरण सुरु केले आहे. त्यासाठी टाटा मोटर्स कंपनीचे सहकार्य घेतले आहे. लसीकरणासाठी पाच लोकांची आवश्यकता असते. महापालिका केवळ एकच कर्मचारी देते.

कारखान्याकडून चार कर्मचारी उपलब्ध केले जातात. कंपनीच्या सहकार्याने कारखान्यातील कामगारांसाठी लसीकरण सुरु केले आहे. मोठ्या कंपन्या, शाळा, आस्थापनांमध्येही त्यांच्या सहकार्याने लसीकरण केंद्र सुरु केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.