Pimpri news: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘इ’ प्रभाग समितीचे अध्यक्ष विकास डोळस आणि संघर्ष स्पोर्ट्स क्लब दिघीगाव यांच्या वतीने कोरोना संकटाविरोधात लढणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, असे या सत्काराचे स्वरूप होते.

कोरोना समर्पित वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. विनायक पाटील, अनिकेत लाठी, भोसरी रुग्णालयाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. लक्ष्मीकांत अत्रे, डॉ. शिवाजी ढगे यांच्यासह दिघी प्रभागातील डॉ. संतोष रोडे, डॉ. राम पवार, डॉ. विशाल लोखंडे, डॉ. शितल लोखंडे, डॉ. विजय पोफळे, डॉ. महेश भारती यांचा सत्कार करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

सामाजिक कार्यकर्ते कुलदिप परांडे, विनोद डोळस, संघर्ष स्पोर्ट्स क्लबचे अनिकेत भुलाडे, सागर डोळस, अमित डोळस, विशाल डोळस, संतोष निकाळजे, विनायक प्रभु आदी यावेळी उपस्थित होते.

‘इ’ प्रभाग समितीचे अध्यक्ष विकास डोळस म्हणाले, “डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात काम करत आहेत. रुग्णांना कोरोनातून बाहेर काढण्याचे काम करीत असताना त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी, त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता म्हणून डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.