Pimpri News: कोरोना योद्धा परिचारिकेला गणपती आरतीचा मान

कोरोना‌ सारख्या महामारीच्या परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या सुर्वे यांना श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने गणपती आरतीचा मान देऊन त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे.

एमपीसी न्यूज – मागील 25 वर्षांपासून पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात मेघा भाऊसाहेब सुर्वे या काम करतात. खराळवाडी येथील श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने त्यांना गणपती आरतीचा मान देण्यात आला.

कोरोना‌ सारख्या महामारीच्या परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या सुर्वे यांना श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने गणपती आरतीचा मान देऊन त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे.

या मंडळानी दिलेल्या सन्नमानाबद्दल त्यांनी श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष परशुराम भांडेकर व महेश मित्र मंडळ अध्यक्ष ऋषिकेश काटे यांचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.