Pimpri News : युवा सेनेच्यावतीने कोरोना योद्धयांचा पुरस्काराने सन्मान

एमपीसीन्यूज : पिंपरी विधानसभा युवासेनेतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कोरोना संकट काळात व लॉकडाऊन कालावधीत उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या व्यक्तींचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

युवा सेना पिंपरी विभागसंघटक निलेश हाके यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

_MPC_DIR_MPU_II

पुरस्कार्थींमध्ये दिनेश तावरे (परिमंडळ अधिकारी अन्नधान्य वितरण विभाग), शंकर अवताडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक -भोसरी ) संजय गायखे, अतुल दौंडकर, ( सामाजिक कार्यकर्ते ) राजू बनसोडे (नगरसेवक ),जयश्री कवडे ( मंडलाधिकारी ), महेंद्र गाढवे ( पोलीस उपनिरीक्षक ), डॉ. विजया आंबेडकर ( ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी ), सुनील चव्हाण ( आरोग्य निरीक्षक ), कैलास पुरी, संदेश पुजारी, मिलिंद कांबळे, संगीता पाचंगे (पत्रकार ), ॲड. विनोद यादव, ॲड. अजित बोऱ्हाडे आदी मान्यवरांचा समावेश आहे.

अविनाश जाधव, बुद्धीसागर गायकवाड, चिंचप्पा निन्गडोळे, महादेव गायकवाड, मनोज काची, प्रमोद गायकवाड, मोसीन शेख, शंकर शेंडगे, अक्षय हाडके उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.