Pimpri News: शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला- आयुक्त हर्डीकर

Pimpri News: Corona's patient doubling rate increased in the city says Commissioner shravan Hardikar जुलैअखेरपर्यंत शहरातील बाधित रुग्णांची संख्या 21 हजार होती. आता 31 हजार आहे. 22 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 40 हजार होईल.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची संख्या दुपट्ट (डबलिंग) होण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. 22 दिवसांनी रुग्णसंख्या दुपट्ट होत आहे. सध्या शहरातील रुग्णसंख्या 31 हजार आहे. त्यानुसार आजपासून 22 दिवसांनी म्हणजेच 3 सप्टेंबरपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 62 हजार होईल, असा अंदाज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वर्तविला आहे. ऑगस्टअखेरपर्यंत रुग्णसंख्येचा आकडा 55 ते 60 हजाराच्या आसपास असेल, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आजपर्यंत 22 हजार जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही दहा हजाराच्या आसपास आहे. सक्रिय रुग्णांवर महापालिकेच्या चार रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. तसेच 32 खासगी रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, जुलैअखेरपर्यंत शहरातील बाधित रुग्णांची संख्या 21 हजार होती. आता 31 हजार आहे. 22 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 40 हजार होईल. कदाचित वेगातही वाढ होऊ शकेल.

आता साधारणतः 31 हजार रुग्ण आहेत. शहरातील रुग्णदुपट्ट होण्याचा कालावधी वाढला आहे. रुग्ण दुप्पट्टीचा कालावधी पूर्वी 12 ते 14 दिवसांवर होता. आता त्यामध्ये वाढ झाली असून रुग्ण दुपट्ट होण्यासाठी 20 ते 22 दिवसांचा कालावधी लागत आहेत.

त्यानुसार आजपासून 22 दिवसांनी शहरातील रुग्णसंख्या 62 हजार होईल. तर, ऑगस्टअखेरपर्यंत रुग्णसंख्येचा आकडा 55 ते 60 हजाराच्या आसपास असेल.

शहरातील 32 खासगी रुग्णालये कोरोनासाठी घेतले आहेत. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पालिकेच्या चार रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पालिकेची सगळी यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त आहे. लवकरात-लवकर जम्बो रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रयत्नशिल आहोत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.