Pimpri News : नाल्यात राडारोडा टाकणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरोधात महापालिकेची पोलिसांकडे तक्रार

एमपीसी न्यूज – नाल्यात राडारोडा टाकणारअया ट्रॅक्टर ( Pimpri News ) चालकाची पिंपरी-चिंचवड माहापालिकेच्या वतीने पोलीसांकडे तक्रार दाखल केली असून. याप्रकऱणी सोमवारी (दि.20) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

Pimpri News : प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना दिशा कार्यगौरव पुरस्कार जाहीर

 

हा प्रकार दापोडी येथील नदीच्या काठावर सोमवारी (दि.20) घडला. यावरून महापालिकेच्या ह प्रभागाचे आरोग्य निरीक्षक सचिन जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रॅक्टर चालक विजय रामू चव्हाण (वय 24 रा.पाषाण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार, आरोपी याने कोणतीही परवानगी नसताना त्याच्या ताब्यातील ट३क्टरदावारे नदीच्या किनाऱ्यावर पालापाचोळा व राडारोडा नाल्यात टाकला.ज्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Pimpri News ) केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.