Pimpri news: कोरोना काळात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पालिका देणार दैनंदिन 150 रुपये प्रोत्साहन भत्ता

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मागील सहा महिन्यांपासून पालिकेचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाविरोधातील लढाई लढत आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत देखील जीवाची पर्वा न करता कामावर हजर राहून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याबद्दल अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कर्मचारी यांना दैनंदिन 150 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोना (कोविड-19) विषाणूचा वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचा-यांना येणे-जाणे, जेवण-खाण इत्यादींसाठी हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मागील सहा महिन्यांपासून पालिकेचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाविरोधातील लढाई लढत आहेत. अनेक अधिकारी, कर्मचारी बाधित झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.