Pimpri News : पिंपरी येथे दाम्पत्याला कोयत्याने मारहाण

हि घटना गुरुवारी (दि.3) रात्री नऊच्या सुमारास एचए मैदान पिंपरी येथे घडली.

एमपीसी न्यूज – पती सोबत गप्पा मारणा-या व्यक्तीला गप्पा थांबवून पत्नीने घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे आलेल्या रागातून संबंधित व्यक्तीने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. त्यावर ‘तू माझ्या पत्नीला शिव्या का देतो’, असा जाब महिलेच्या पतीने विचारला असता त्यांच्या डोक्यात व पाठीवर कोयत्याने दुखापत केली. हि घटना गुरुवारी (दि.3) रात्री नऊच्या सुमारास एचए मैदान पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी बापू लक्ष्मण काळे ( वय. 30, रा. एचए मैदान, चव्हाण हाॅस्पिटल समोर, पिंपरी ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनजीत दलविर सिंग ( वय. 45, रा. एचए मैदान, चव्हाण हाॅस्पिटल समोर, पिंपरी ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापू काळे हे फिर्यादी मनजीत सिंग यांच्या झोपडी समोर गप्पा मारत थांबले होते.

यावेळी मनजीत यांच्या पत्नीने काळे यांना ‘भाऊ बास झाल्या गप्पा, तू तुझ्या घरी जा’ असे सांगितले. त्यामुळे राग आलेल्या आरोपी काळे याने मनजीत सिंग यांच्या पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

त्यावर ‘माझ्या पत्नीला शिव्या का देतो’, असा जाब मनजीत यांनी विचारला असता आरोपीने शेजारी असलेल्या कोयता दाम्पत्याच्या डोक्यात व पाठीवर मारून त्यांना जखमी केलं तसेच लाथा बुक्यानी मारहाण करून ‘तुम्हाला सोडणार नाही’, असा दम भरला.

पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.