Pimpri news: उद्योगनगरीत ‘कॉर्पोरेट लसीकरण’ मोहिमेसाठी ‘कोविड- 19 हेल्पडेक्स’

45 वर्षांपुढील कामगारांचे कंपनीतच होणार लसीकरण

0

एमपीसी न्यूज – ‘कामगारनगरी’ अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक कंपन्यांमधील कामगारांसाठी कंपनीतच महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कोविड- 19 लसीकरण केंद्र कार्यान्वयीत करण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात ‘कोविड- 19 हेल्पडेक्स’ सुरू करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाकडून कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांनीही पुढाकार घ्यावा.

कंपनीत कोविड- 19 लसीकरण केंद्र कार्यान्वयीत करण्यासाठी संबंधित कंपनींच्या मनुष्य संसाधन विभागाने ‘कोविड-19 हेल्पडेक्स’ला संपर्क करावा. त्याद्वारे कंपनीत लसीकरण केंद्र कार्यान्वयीत करण्याबाबत सर्वोतोपरी कार्यवाही करण्यात येईल, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. बहुसंख्य कंपन्यांमध्ये कामगारांसाठी मेडिकल युनिट कार्यान्वयीत आहे. त्याठिकाणी योग्य व्यवस्था केल्यास 45 वर्षे वय व त्यापुढील कामगारांना कोविड-10 लसीकरण करता येवू शकते. परिणामी, लसीकरणाची संख्याही वाढणार आहे. त्यासाठी कंपन्यांनी सकारात्मक पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.

कार्पोरेट कंपन्यांसाठी ‘कोविड-19 हेल्पडेक्स’

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने कार्पोरेट कंपन्यांसाठी कोविड-19लसीकरण केंद्र कार्यान्वयीत करण्याबाबत हेल्पडेक्स सुरू केला आहे. 7057001010 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. तसेच, [email protected] या मेल आयडीवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment