Pimpri News : डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात कोविड-19 लसीकरण मोहिमेस प्रारंभ

एमपीसी न्यूज: डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र ( Dr. D. Y. Patil Medical Collage And Research Center) व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ( Pimpri chinchwad Municipal Corpration) यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून कोविड-19 लसीकरण ( Covid-19 Vaccination)  कार्यक्रमास सुरुवात झाली. याचे उद्घाटन रुग्णालयाचे कोषाध्यक्ष व विश्वस्त डॉ. यशराज पाटील ( Dr. Yashraj Patil) यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक विभागाचे व्यवस्थापक डॉ. अर्जुन काकरानी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. एच. एच. चव्हाण, आदी उपस्थित होते. डॉ. अर्जुन काकरानी यांनी कोविडशील्ड लस घेऊन लसीकरणाच्या अभियानास प्रारंभ केला. तसेच ही लक्ष सुरक्षित असल्याचा संदेश देत सर्वांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

नुकतेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नुकतेच पिंपरीतील डॉ.डी. वाय पाटील रुग्णालयाला कोविड-19 लसीकरण कार्यक्रम राबवण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार निरीक्षण कक्ष, लसीकरण कक्ष, प्रतिक्षालय आदींची स्वतंत्र व्यवस्था करत या अभियानास उत्साहात सुरवात झाली.

दररोज शंभर कोरोना योद्धांना लस देण्यात येणार आहे. या लसीकरणाबाबतच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची माहिती भित्ती पत्रकाद्वारे देण्यात येत असून ‘मी लसीकरण केले’ व लस सुरक्षित असल्याचे सेल्फी स्टॅंड सर्वांना आकर्षित करून घेत आहेत. सर्व कोरोना प्रतिबंधनात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन या अभियानात करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like