-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News: ‘कोविशिल्ड’ लसीची टंचाई कायम, गुरुवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ‘कोविशिल्ड’ लसीची टंचाई कायम आहे. आजही ‘कोविशिल्ड’ची लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे उद्या (गुरुवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिक, गरोदर, स्तनदा माता आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना नवीन जिजामाता रुग्णालय आणि फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस मिळणार आहे. कोविन अ‍ॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. उद्या सकाळी 8 नंतर कोविन अ‍ॅपवर नोंदणीसाठी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. गरोदर, स्तनदा मातांसाठी लसीकरण केंद्रांच्या क्षमतेमधील 10 डोस राखीव ठेवण्यात येणार आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

तर, 45 वर्षांपुढील नागरिकांना सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी आणि पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा या केंद्रांवर 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस मिळणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 9 वाजल्यानंतर टोकन वाटप करण्यात येणार आहे. ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.