Pimpri News : सोमवारी 56 केंद्रांवर मिळणार कोविशील्ड लस; कोव्हॅक्सिनचे लसीकरण राहणार बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि. 14) 56 केंद्रांवर कोविशील्ड लसीचे लसीकरण होणार आहे. तर लससाठा उपलब्ध नसल्याने कोव्हॅक्सिनचे लसीकरण सोमवारी बंद राहणार आहे. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे.

18 वर्षांवरील नागरिकांना या केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’लस

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण, ईएसआयएस हॉस्पिटल मोहनगर चिंचवड, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, चिंचवड स्टेशन दवाखाना, प्रेमलोक पार्क दवाखाना, कै शिवाजी भोईर सांस्कृतिक सभागृह केशवनगर चिंचवड, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, बिलजीनगर दवाखाना, किवळे दवाखाना, जुने तालेरा रुग्णालय, मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट क्लीनिक वाल्हेकरवाडी, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत, जिल्हा परिषद शाळा ताथवडे, पुनावळे दवाखाना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी,

महापालिका कन्याशाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, हनुमंतराव भोसले दवाखाना नेहरूनगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल पिंपरी, बाबाजी पांडू भांडे पिंपळे निलख दवाखाना, मारुती गेणू प्राथमिक शाळा कस्पटे वस्ती वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, नवीन थेरगाव रुग्णालय थेरगाव, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, महापालिका शाळा वाकड, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, माजी सैनिक भवन दत्तनगर दिघी, सखुबाई गवळी गार्डन भोसरी, पद्मावती मोबाईल कोविड हॉस्पिटल च-होली, महापालिका बहुद्देशीय तालीम इमारत बोपखेल, गंगोत्री पार्क भोसरी, अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी,

ठाकरे शाळा रुपीनगर, तळवडे समाजमंदिर शाळा, घरकुल दवाखाना चिखली, विवेकानंद बॅडमिंटन हॉल यमुनानगर, भानसे स्कुल यमुनानगर, प्राथमिक शाळा 92 म्हेत्रे वस्ती, महापालिका शाळा रहाटणी, जुने जिजामाता रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, कासारवाडी दवाखाना, दापोडी दवाखाना, अहिल्यादेवी होळकर सांगवी महापालिका शाळा, दीनदयाल शाळा संत तुकाराम नगर पिंपरी, निळू फुले नाट्य गृह पिंपळे गुरव, आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी या 56 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा, प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस

अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.