Pimpri Vaccination News : शहरातील ‘या’ 64 केंद्रांवर शनिवारी मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस

परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचेही उद्या लसीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील परदेशात शिक्षणासाठी जाणा-या 18 ते 44 या वयोगटातील विद्यार्थी आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शनिवारी) कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

परदेशात शिक्षणासाठी जाणा-या ज्या विद्यार्थ्यांनी आवश्यक वैध पुराव्यानिशी ‘मी जबाबदार अॅप’वर 4 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचे उद्या, शनिवारी नवीन जिजामाता रुग्णालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण होणार आहे. या केंद्रावर 300 लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.

ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.

‘या’ 63 केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’ लस !

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई आंब्रेला संभाजीनगर दवाखाना, रोटरी क्लब सेंटर, आरटीटीसी सेंटर, महापालिका कन्या शाळा, चिखली, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय निगडी, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, महापालिका शाळा खराळवाडी, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, नेहरूनगर उर्दू शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, एसएस अजमेरा स्कुल, अजमेरा, दीनदयाल शाळा संत तुकारामनगर, क्वालिटी सर्कल भोसरी, समता स्कुल चक्रपाणी वसाहत भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, सखुबाई गार्डन भोसरी, सावित्रीबाई फुले मोशी दवाखाना,

छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, बाबा मंगल कार्यालय धावडे वस्ती, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, बास्केटबॉल ग्राऊंड स्पाईन रोड मोशी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर सांगवी महापालिका शाळा, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, कासारवाडी दवाखाना, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, खिवंसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले महापालिका शाळा, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर , महापालिका शाळा रहाटनी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरीवाघेरे,

फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड, महापालिका शाळा किवळे, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड, प्रेमलोक पार्क दवाखाना आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.