Pimpri News: ‘क्रिसील’ची निविदा रद्द करा – राष्ट्रवादीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी स्थायी समितीच्या सभेत बहुमताच्या जोरावर मान्यता दिलेली क्रिसील रिस्क अ‍ॅण्ड इन्फास्ट्रक्चर सोल्युशन्स लि.या सल्लागारची निविदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाकडे केली.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासह स्थायी समिती सदस्य राजू बनसोडे, पौर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, स्थायी समिती विषय क्रमांक 27  मे. क्रिसील रिस्क अन्ड इन्फास्ट्रक्चर सोल्युशन्स लि.या सल्लागार याची निविदा होती. 1 कोटी 70 लाख रुपयांची निविदा सत्ताधा-यांनी स्थायी समितीच्या सभेत पाशवी बहुमताच्या जोरावर मजुंरी देण्यात आली. परंतु, या निविदा धारकाची यापूर्वीची कामाची गुणवत्ता योग्य नाही.

सल्लागार कंपनी बड्या राजकीय नेत्याच्या संबंधित आहे. त्यामुळे पुणे महापालिकेमध्येही सल्लागार कंपनीच्या नेमणुकीला विरोध झाला आहे. या कंपनीची महापालिकेला कोणत्या कामासाठी सल्लागार करिता नेमणूक होणार आहे, हे ही स्पष्ट होत नाही. त्यामुळे मे. क्रिसील रिस्क अ‍ॅण्ड इन्फास्ट्रक्चर सोल्युशन्स लि.या सल्लागारची योग्य ती चौकशी करावी. निविदा रद्द करुन महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळावे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.