Pimpri News: महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवारी प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतीदिनानिमित्त उद्या रविवारी प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 10 वाजता महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. यानंतर सकाळी 10.45 वाजता पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाईल.

पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाजवळील मैदानात सकाळी 11 वाजता शिवशाहीर संतोष साळुंके आणि संच यांचा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी 1 वाजता थिएटर वर्कशॉप कंपनी यांचे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित ‘मानवांचा धर्म एक’ या विषयावरील नाटक सादर केले जाणार आहे. दुपारी 3 वाजता निमंत्रित कवींचे कवि संमेलन तसेच स्वप्निल पवार, शेखर गायकवाड, धीरज वानखेडे, संकल्प गोळे, विशाल ओव्हाळ, प्रज्ञा इंगळे इत्यादी कलाकारांचे ‘वंदन क्रांतिज्योतीला’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले.

या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.