Pimpri News: शिवजयंतीनिमित्त डांगे चौक ते किल्ले राजगड सायकल रॅली

0

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त इंडो अथलेटिक्स सोसायटीच्या वतीने डांगे चौक ते किल्ले राजगड भव्य सायकल रॅली काढण्यात आली.

किल्ले राजगड येथे रात्री 9.30 वाजता सायकलिंगद्वारे रॅली काढण्यात आली. ही रॅली डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून ते राजगड पर्यंत काढण्यात आली. माजी खासदार गजानन बाबर यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.

_MPC_DIR_MPU_II

शिवसेना नगरसेवक अमित गावडे, कृष्णलाल बन्सल उपस्थितीत होते. चंद्रकांत खैरे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोहन बाबर, धीरज बाबर, गणेश बाबर, भुजबळ,  योगेश वेदपाठक व सहभागी सायकलस्वार उपस्थित होते.

माजी खासदार बाबर यांनी उपस्थित सहभागी सायकलस्वारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सायकलस्वारांना मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.