Pimpri News : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिका आणि लायन्स क्लबच्या वतीने सायक्लोथॉन

एमपीसी न्यूज – प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि लायन्स क्लब यांच्या वतीने सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही सायक्लोथॉन रविवारी (दि. 20) सकाळी सात ते दहा या वेळेत होणार आहे.

‘प्रदूषणाला देण्या टक्कर आमचा प्रवास आता सायकलवर’ असे म्हणत या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. हे सायक्लोथॉन सांगवी फाटा – साई चौक – सांगवी फाटा या मार्गावरुन होणार आहे.

पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकताच फीट राहण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांना व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला. प्रत्येकाने कोणत्या तरी एखाद्या व्यायाम प्रकारचा व्यासंग करायला हवा, असे आवाहन आयुक्तांनी केले होते.

त्यानंतर प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सायकल वापराला प्रोत्साहन देण्याची गरज लक्षात घेत महापालिका आणि लायन्स क्लब यांनी सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी करून जास्तीत जास्त पिंपरी-चिंचवडकरांनी सायक्लोथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा –
https://bit.ly/PCMCCYCLOTHON2020Reg

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.