Pimpri news: पालिकेतर्फे सायक्लोथॉन, वॉकेथॉनचे आयोजन; महापौरांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सायक्लोथॉन व वॉकेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.1) महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सकाळी सात वाजता त्याचे उद्घाटन होणार आहे.

ऑटोक्लस्टर, चिंचवड येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पिंपरी-चिंचवड पालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्टसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 15 व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या (MoHUA)’इंडिया सायकल्स 4 चेंज’ या उपक्रमांतर्गत सायक्लोथॉन व वॉकेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जातात. पालिकेने नुकताच याबाबतचा एक सर्व्हे देखील केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.