Pimpri news: ‘महाराष्ट्रद्रोही कंगनाचा धिक्कार असो’; संतप्त शिवसैनिकांनी जाळले कंगनाचे पोस्टर

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने कंगनाचा धिक्कार करत तिचे पोस्टर जाळले.

एमपीसी न्यूज – मुंबईला पाकव्याप्त काश्मीर बोलणाऱ्या आणि मुंबई पोलिसांबद्दल चुकीचे विधान करणारी अभिनेत्री कंगना राणावत विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने कंगनाचा धिक्कार करत तिचे पोस्टर जाळले.

आकुर्डीतील खंडोबा चौकात जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आणि शहरप्रमुख योगेश बाबर यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवारी) झालेल्या आंदोलनात अनिता तुतारे, अधिक भोसले, प्रदीप दळवी, रोमी संधू, वैशाली कुलथे, सरिता साने, शैला निकम, मनीषा घाडगे, भाग्यश्री म्हस्के, वैशाली काटकर, शर्वरी जळमकर, क्रांती शिंदे, अमोल निकम, ज्ञानेश्वर शिंदे, सुदर्शन देसले, राजेश काळे, अमित शिंदे आदी शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

‘महाराष्ट्र द्रोही कंगनाचा धिक्कार असो’, ‘चले जावं चले जावं कंगना राणावत चले जावं’, ‘कंगनाचे करायचे काय खाली डोके वरपाय’, कंगनाचा निषेध, मुंबई पोलीस, मुंबई आमची शान, तिचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. यावेळी कंगनाचे पोस्टर जाळण्यात आले.

दरम्यान, कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. मुंबईची भीती वाटत असेल तर कंगनाने परत येऊ नये अशी टीका राऊत यांनी केली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1