Pimpri News : कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने नाट्य संगीताची मोठी हानी – नंदकिशोर कपोते

एमपीसी न्यूज – संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन झालंय. वयाच्या 70 व्या वर्षी पुण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने नाट्य संगीताची मोठी हानी झाली आहे. अशा शब्दांत कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नंदकिशोर कपोते म्हणाले, ‘कीर्ती शिलेदार यांना मी 30 वर्षांपासून ओळखतो . अनेक महोत्सवात आम्ही एकत्र कार्यक्रम केले होते. मी बालगंधर्वांच्या नाट्य संगीतावर नृत्य नाटिका सादर केली होती ती त्यांनी आवर्जून पाहिली व कौतुक केले. कीर्ती शिलेदार यांनी नाट्य संगीताची परंपरा भक्कमपणे सांभाळली. त्यांनी नाट्य संगीत जिवंत ठेवले. त्या नाट्य संगीतातील दैद्विप्यमान तारा होत्या.’

‘कीर्ती शिलेदार यांच्या अचानक जाण्याने नाट्य संगीताची मोठी हानी झाली आहे. नाट्य संगीत पोरके झाले असून, ही कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. किर्ती शिलेदार आज जरी आपल्यात नसल्या तरी नाट्य संगीताच्या रूपाने त्या सदैव आपल्यात राहतील.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.