Pimpri News: मृत्यूचा आकडा कमी होईना; आज 91 मृत्यू; 1 हजार 985 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मागील पाच दिवसांपासून दिवसाला 90 हून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. आज (मंगळवारी) 91 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर, शहराच्या विविध  भागातील 1 हजार 985 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज  नोंद झाली.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2376 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे ही दिलासादायक बाब मानली जात आहे. शहरातील 53 आणि महापालिका हद्दीबाहेरील 38 अशा 91 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 65 पुरुष आणि 26 महिला रुग्णांचा समावेश आहे.  मागील चोवीस तासात 18 मृत्यू झाले आहेत. यापूर्वी मृत्यू झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले.

शहरात आजपर्यंत 2 लाख 3 हजार 945 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 77 हजार 524 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2776 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 1294 अशा 4 हजार 70 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 8 हजार 587 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1 हजार 728 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 3 लाख 79 हजार 280 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.