_MPC_DIR_MPU_III

Pimpri News: ‘तीज सतू सजावट’ स्पर्धेत दीपा कासट प्रथम, प्रिती पुंगलिया द्वितीय

'तीज सतू सजावट ' ऑनलाईन स्पर्धेला मारवाडी समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. : Deepa Kast first, Preeti Pungalia second in 'Teej Satu Decoration' competition

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ व सांगवी परिसर महेश मंडळ महिला समिती यांच्यावतीने आयोजित ‘तीज सतू सजावट ‘ ऑनलाईन स्पर्धेला मारवाडी समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत अमरावतीच्या दीपा कासट यांनी प्रथम, पुण्यातील प्रिती पुंगलिया यांनी द्वितीय तर शिरुरमधील सोनाली बिहानी यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

_MPC_DIR_MPU_IV

श्रावण कृष्ण पक्षातील तृतिया (तीज ) या दिवशी येणाऱ्या सणाला मारवाडी समाजात मोठे महत्व आहे. या दिवशी महिला दिवसभर उपवास धरून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात. त्याला सतू तीज असे म्हणतात.

विविध धान्यापासून बनवलेल्या शिवलिंगच्या आकारासारख्या पदार्थाला सतू असे म्हणतात. या पदार्थाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने सजवले जाते. अशी आगळीवेगळी स्पर्धा सांगवी परिसर महेश मंडळ तर्फे ऑनलाईन ट्रोकेट अँपवर घेण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

या स्पर्धेत मुख्यतः महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, गुजरात, राजस्थान व परदेशातून अमेरिका येथील महिलांनी भाग घेतला. या स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.

महिलांनी पदार्थ बनवताना त्याचे छायाचित्रण करून सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची माहिती दिली. त्या छायाचित्रणास जनतेतून मते मागविण्यात आली. त्या स्पर्धेला 80 हजारहून अधिक प्रेक्षकांनी ऑनलाईन भेट दिली.

स्पर्धेचे पंच हेही ऑनलाईन होते. पंच म्हणून ब्रह्मानंद लाहोटी व प्रीती लाहोटी यांनी कामगिरी पार पाडली.

स्पर्धेच्या आयोजनासाठी पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्ष मीनाक्षी सारडा , ऑनलाईन ट्रोकेट ॲपचे अनुप धीरन, सांगवी महेश मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया, पद्मा लोहिया, कविता लद्धा यांनी परिश्रम घेतले .

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.